बुलडाण्यासह तीन जिल्हयातून दरोडेखोरांचा थरारक पाठलाग

50

बुलडाण्यासह तीन जिल्हयातून दरोडेखोरांचा थरारक पाठलाग
एलसीबी पोलिस निरीक्षक संदीप पाटलांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न
प्रतिनिधी | बुलडाणा,
संशयीत दरोडे़खोरांच्या वाहनाचा तिन जिल्हयातून थरारक पाठलाग करत दोघांना अकोला येथे अटक करण्यात आली. सदर घटना सोमवार १६ जून रोजी घडली. दरम्यान यावेळी आरोपीने पाठलाग करणारे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या अंगावर वाहन घालून मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार सीमावर्ती भागातील मुक्ताईनगर परिसरात गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील, पोलिस उपनिरीक्षक अनिल जाधव, हेडकॉन्स्टेबल दर्शन ढाकणे हे १५ जून रोजी रात्री जिल्ह्यात गस्त घालत होते. त्यावेळी मुक्ताईनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कुंड गावात दरोडा टाकण्याच्या उद्देशाने एका घराकडे जाणाऱ्या चार जणांना पोलिसांचे वाहन दिसले. त्यामुळे त्यांनी सदर वाहन वेगाने दामटले. यावेळी सदर व्यक्ती हे दरोडेखोर असल्याच्या संशयावरून एलसीबीच्या पथकाने त्यांचा पाठलाग सुरू केला. मुक्ताईनगर, खामगाव, अकाेला हा महामार्ग असल्याने व रात्री उशिरापर्यत या मार्गावर माेठया प्रमाणात वाहनांची वाहतूक होत असल्यांनी त्यांनी आपला रु़ख या मार्गाकडे वळवला. संशयितांचे वाहन एवढया वेगाने होते की, त्यांना रोखण्यासाठी जळगाव गुन्हे शाखेला जळगाव मध्ये सदर वाहनास थांबवण्यात पोलिसांना यश मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी बुलडाणा जिल्हयातील ़खामगाव येथे रात्री ३.१० वाजेच्या दरम्यान नाकाबंदी करण्याची सुचना दिल्याची माहिती मिळाली. परंतू आरोपींनी या ठिकाणी देखील पोलिसांना गुंगारा देत अकोला जिल्हयाकडे आपले वाहन भरधाव वेगाने दामटले. यावेळी समोर आलेल्या अनेक वाहनांना समाेरे जात धोकादायक पध्दतीने या आरोपींनी आपले वाहन पळवल्याने पोलिसांच्या छातीची धडकी वाढली होती, परंतू सदर दरोडेखारंाचा पाठलाग करत एवढया लांब आल्यावर पोलिस निरीक्षक पाटील यांनी माघार घेण्याचे टाळत दरोडेखोरांचा पाठलाग सुरुच ठेवला. यावेळी त्यांनी अकोला जिल्ह्यातील पोलिसांना सदर विषयाची माहिती देत
नाकाबंदी विषयी कळवले. पहाटे ३.४० वाजता रिधोरा (जि. अकोला) शिवारात पोलिसांनी ट्रक आडवा लावला त्यामुळे आरोपींनी त्या ठिकाणी कार थांबवली. यावेळी लगेच पथकाने कारकडे धाव घेतली असता कार मधील चार जणांनी घटनास्थळावरुन पळ काढला; मात्र कारचालक अरबाज खान फिरोज खान वय २३, रा. अकोला याने पथकावर वाहन आणून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. यात पोलिस निरीक्षक पाटील यांना मुकामार लागल्याची माहिती आहे.

आरोपींनी सांगितली माहिती
दरम्यान पकडण्यात आलेल्या आरोपी अरबाज खान फिरोज खान याला अटक केल्यानंतर त्यांनी आपल्या सोबत असलेल्या सह आरोपीची नावे सांगितली, यात सम्यद फिरोज उर्फ अनडूल सय्यद झहीर रा. कसारखेडा, जि. अकोला, इमरान, तन्नू उर्फ तन्वीर, अफरोज खान उर्फ अप्या व अफजल सय्यद यांचा समावेश असल्याची माहिती दिली.

एकास अकोला पोलिसांनी केली अटक
घटनेच्या नंतर अकोला पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित आरोपी अफजल सय्यद याला ताब्यात घेतल्याची माहिती आहे. त्याची चौकशी सुरु असल्याची माहिती मिळाली आहे. यावेळी पकडण्यात आलेल्या आरोपीच्या वाहनातून पोलिसांना तलवार, गुप्ती, चाकू, लोखंडी रॉड, दोर, कपडे व कार असा माल मिळाला असून पोलिसांनी एकूण १० लाखांचा माल जप्त केला.

़़़़़़़़—————