चिखलीच्या व्यापाऱ्याची ओडीसात दहा ला़खाने फसवणूक, तिघा विरोधात गुन्हा दाखल

32

चिखलीच्या व्यापाऱ्याची ओडीसात दहाला़खाने फसवणूक
तिघाविरोधात गुन्हा दाखल

प्रतिनिधी | बुलडाणा,
चिखली येथील एका ड्रायफ्रुट विक्रेत्या व्यापाऱ्याची ओडीसातील व्यापाऱ्याने दहा लाखाने फसवणूक केल्याची घटना नुकतेच उघडकीस आली. या घटनेमुळे शहरातील इतर ड्रायफ्रुट विक्रेता व्यापाऱ्यात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी तिघाविरोधात चिखली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेलया माहिती नुसार चिखली तालुक्यातील भानखेडा येथील व्यापारी हरिदास एकनाथ इंगळे वय ४२ वर्ष, हे गोडंबी व इतर सुकामेव्याचा व्यापार करतात. सदर व्यापार हा वडीलोपार्जित असून त्यांना व्यवसायासाठी लागणारा कच्चा माल ते मागील अनेकवर्षापासून ओडीसा येथून विकत घेतात. मागील पाच वर्षापासून ते ओडीसा राज्यातील ठाकुरमुंडा जिल्हा मयुरबंज येथील व्यापारी सर्वेश्वर जेना यांच्या संपर्कात होते. त्यांना पैसे देवून त्याच्याकडून ते माल खरेदी करत होते. सदर मालासाठी २४ मार्च २०२५ रोजी भानखेडा येथील व्यापारी हरिदास इंगळे यांनी सुमारे एक लाख रुपये व्यापाऱ्याच्या खातात पाठवले. त्यांनतर २६ मार्च रोजी तीन लाख रुपये, २८ मार्च रोजी व्यापारी सर्वेैश्वर यांची मुलगी शुभश्री जेना यांच्या खात्यात एक लाख रुपये, २९ मार्च रोजी पुन्हा शुभश्रीच्या नावे एक लाख, सर्वेश्वरच्या खात्यात याच तारखेला २ लाख रुपये, १६ एप्रिल रोजी शहान्नव हजार रुपये, शुभश्री जेना हिच्या फोन पे खात्यावर १ लाख ३४ हजार रुपये, व्यापाऱ्याचा मुलगा सत्यम याच्या खात्यात ४५ हजार असा एकूण १० लाख ७५ हजार रुपये वेळोवेळी पाठवले. सदर रक्कमेचा माल सर्वेक्षर यांनी पाठवला नाही. या संदर्भात वारंवार फोन करुन संपर्क केला असता ते टाळत आहेत, असा आरोप इंगळे यांनी केला आहे. त्यानंतर इंगळे यांनी या संदर्भात त्यांचा मुलगा सत्यम व मुलगी शुभश्री यांच्या मोबाइलवर संपर्क करुन माल पाठवण्या बाबत विचारणा करत असल्याने त्यांनी प्रारंभी १० ते १५ दिवसात माल येणार अशी ग्वाही दिली परंतू अद्याप ही त्यांनी माल पाठवला नाही. त्यामुळे इंगळे हे स्वता त्यांच्या गावी जावून मालाची मागणी कली असता, त्यांनी माल व पैसे परत देण्यास नकार दिल्याचा आरोप इंगळे यांनी केला आहे.
या प्रकरणी इंगळे यांच्या तक्रारीवरुन चिखली पोलिसात ओडीसा निवासी आरोपी सर्वेश्वर जेना, सत्यम जेना व शुभश्री जेना यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

़़़़़़़़़़़़़़़़़़———