आ. संजय गायकवाड यांची जिल्हा संघटक प्रमुख पदी निवड

34

आ. संजय गायकवाड यांची जिल्हा संघटक प्रमुख पदी निवड
स्थानीय स्वराज संस्थेच्या निवडणूकीच्या अनुशंगाने उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आदेश
प्रतिनिधी | बुलडाणा,
राज्यात होणाऱ्या स्थानीय स्वराज संस्थेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर शिवसेना पक्षाला जिल्हयात अधिक बळकट बनवण्याची जवाबदारी ही आ. संजय गायकवाड यांच्या ़खांद्यावर टाकण्यता आली आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या आशयाचे नियुक्तीपत्र आ. गायकवाड यांना ३ जून रोजी दिले.
मिळालेल्या माहितीनुसार यापूर्वीच्या जिल्हा संपर्क प्रमुख पदाच्या नियुक्त्या पक्षाच्यावतीने रद‌द जाहिर करण्यात आल्या आहेत. तसेच मागील सात वर्षात आ. संजय गायकवाड यांनी जिल्हयाभरात शिवसेनापक्षाची मोर्च बांधणी अतिशय नियोजनबध्द पध्दतीने केली आहे. ग्रामीण व शहरी भागात त्यांनी उभारलेल्या विकासाच्या झंझावातात अनेकांनी त्यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश ही केला आहे. त्यामुळे जिल्हा शिवसेना ही भक्कम झाली आहे. येणाऱ्या काळात स्थानीय स्वराज संस्थेच्या निवडणूका होणार आहे. या निवडणूकीत शिवसेनेला प्रचंड यश मिळावे यासाठी कुशल संघटन, जिदद, चिकाटी पाहता राज्याचे उपमुख़्चयमंत्री एकनाथ शिंदे यांनी आ. संजय गायकवाड यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत सदर संधी त्यांना प्रदान केली आहे.
जिल्हयाभरातील जिल्हा परिषद, पंचायत समिती व इतर स्वराज संस्थेत शिवसेना पक्षाच्या जास्तीत जास्त जागा निवडणूक अाणण्यासाठी त्यांच्यावर जवाबदारी टाकण्यात आली आहे. या पदाच्या अधिनस्थ असलेल्या अंगिकृत संघटना आहेत त्या देखील त्या देखील आ. संजय गायकवाड यांच्या नेतृत्वात काम करणार आहेत. या निवडी बददल सर्व पदाधिकारी, मित्र परिवाराच्यावतीने त्यांचे स्वागत केले जात आहे.