संजय गायकवाड सह एक अन्यवर गुन्हा दाखल

114

संजय गायकवाड सह एक अन्यवर गुन्हा दाखल
दारु पीण्यासाठी दुसरीकडे का जातो म्हणत फायटरने केली मारहाण

प्रतिनिधी | बुलडाणा,

दारु पीण्यासाठी दुसरीकडे का जातो असे म्हणत एकास लोखंडी फायटरने मारहाण केल्या प्रकरणी भीलवाडा परिसरातील संजय गायकवाड व एक अन्य वर गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना ३० मे रात्री घडली.
पोलिस सुत्राकडून मिळालेल्या माहिती नुसार शहरातील भीमनगर भागातील रहिवासी अक्षय गवारगुरु वय २६ सदर युवकास दारु पीण्याचे व्यसन आहे. हा पूर्वी नियमतपणे शहरातील भीलवाडा परिसरातील रहिवासी संजय गायकवाड यांच्याकडे जात होता. परंतू त्याने मागील अनेक दिवसापासून आरोपीकडे दारु पीण्यासाठी जाने सोडले. ३० मे रोजी अक्षय हा बाजारात जात असतांना त्याला आरोपीने हटकले व तु दुसरीकडे दारु पीण्यासाठी का जातोस अशी विचारणा केली. यावेळी दोघात या विषयावरुन बाचाबाची झाली. यावेळी आरोपीने लोखंडी फायटरने मारहाण करुन अक्षयला जखमी केले.
या प्रकरणी अक्षय गवारगुरु यांच्या तक्रारीवरुन शहर पोलिसात आरोपी संजय गायकवाड व त्याचा मित्र विशाल गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.