सेलेनियम विषबाधेमुळे केस-नखांची गळती? घाबरू नका, नखे आणि केस पुन्हा येतील – डॉ. डिकी यांचे आश्वासन

22
बुलढाणा (प्रतिनिधी): शेगाव, खामगाव आणि नांदुरा तालुक्यातील १६ गावांमध्ये नागरिकांच्या केस आणि नखांची गळती ही सेलेनियम विषबाधेमुळे (Selenium Toxicity) झाली असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ही विषबाधा आता शरीरातून बाहेर पडत असून, त्यामुळे तात्पुरती लक्षणे दिसून येत आहेत, अशी माहिती केंद्रीय पथकाने दिली आहे.

राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राच्या (NCDC) संचालिका डॉ. तंजिन डिकी यांनी स्पष्ट केले की, “घाबरण्याचे कारण नाही. केस आणि नखे पुन्हा येतात. बाधितांनी हायप्रोटीनयुक्त आहार घ्यावा.”

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेली बैठक


लक्षणे कशी ओळखाल?
✔️ केस गळणे
✔️ नखे निघणे
✔️ गंधयुक्त श्वास
✔️ चव कमी होणे
✔️ चक्कर येणे

🧪 नमुने संकलनाचे महत्त्व
केंद्राच्या नऊ सदस्यीय पथकाने शेगाव, खामगाव आणि नांदुरा तालुक्यातील चार गावांमध्ये अन्नधान्य, किराणा साहित्य, रेशनचे धान्य, माती आणि पाण्याचे नमुने घेतले.
त्याशिवाय, बाधित नागरिकांचे केस व नखांचेही सॅम्पल घेतले गेले. नमुन्यांचे पॅकेजिंग बुलढाणा येथील अन्न व औषध प्रशासन कार्यालयात करण्यात आले.

🧾 हेवी मेटल तपासणीचा प्रयत्न
कृषी विभागाच्या माहितीनुसार, जमिनीत १२ प्रकारची मूलद्रव्ये तपासली जातात, मात्र हेवी मेटल तपासणी त्यात होत नाही. त्यामुळे खास नमुने तपासणीसाठी वेगळ्या प्रयोगशाळेत पाठवले जातील.

पथकाची जिल्हाधिकाऱ्यांशी थेट चर्चा
केंद्रीय पथकातील सर्व सदस्यांनी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यांनी गेल्या दोन दिवसांत केलेल्या सॅम्पलिंगचा तपशील देत, संभाव्य विषबाधेची स्थिती स्पष्ट केली. जिल्हा प्रशासनही या प्रकरणात सतर्क असून, पुढील हालचाली केंद्राच्या मार्गदर्शनाखाली केल्या जाणार आहेत.