सिंदखेड राजा येथील ऐतिहासिक चांदणी तलावाची भिंत तोडणाऱ्यांवर कार्यवाही करा

26

सिंदखेड राजा येथील ऐतिहासिक चांदणी तलावाची भिंत तोडणाऱ्यांवर कार्यवाही करा 

अशोक राजे जाधव जिल्हाअध्यक्ष छावा संघटना

सिंदखेड राजा,

मातृतिर्थ सिंदखेड राजा शहरात अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. या शहरात असलेला ऐतिहासिक वारसा चांदणी तलाव आहे.या तलावाची भिंत काही अज्ञात लोकांनी तोडली असून,त्यामुळे या तलावाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

या तलावाची भिंत 15 ते 20 मीटर लांब आणि 1 ते 1.5 मीटर उंच भिंत तोडली असून, त्यामुळे या ऐतिहासिक तलावाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. पुरातत्व विभागाच्या नियमानुसार, चांदणी तलावापासून 100 मीटर अंतरावर कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यास परवानगी नाही. तरी असे असताना देखील नियमांचे उल्लंघन करून तलावाची भिंत तोडण्यात आली आहे. या घटनेची माहिती बुलढाणा छावा संघटनेला मिळताच, संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक राजे जाधव यांच्या नेतृत्वाखाली तात्काळ उपविभागीय अधिकारी सिंदखेड राजा यांच्या मार्फत भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग, नागपूर सेमिनरी हिल, नागपूर यांना निवेदन देण्यात आले. निवेदना मध्ये दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या निवेदनात, तलावाची भिंत तोडल्याने तलावाचे सौंदर्य नष्ट झाले असल्याचे, तसेच ऐतिहासिक वारसा धोक्यात आल्याचे म्हटले आहे. दोषींवर तातडीने कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा छावा संघटनेच्या वतीने निवेदनात देण्यात आला आहे. या निवेदनाची प्रत पंतप्रधान कार्यालय, मुख्यमंत्री कार्यालय, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग आणि जिल्हा प्रशासनाला पाठवण्यात आली आहे.