परप्रांतीय मजुरांच्या वाहनांवर कारवाई करु नका – आ. संजय गायकवाड
अस्मानी संकटाने त्रस्त शेतकरी आता मजूरांसाठी हैराण
आ. गायकवाड यांनी दिले जिल्हा प्रशासनाना पत्र
प्रतिनिधी | बुलडाणा | धाड
जिल्हयाभरात परतीच्या पावसाने थैमान घातले. परतीच्या या पावसामुळे जिल्हयात शेतकऱ्यांचे हाताशी आलेले पीक डोळया देखत बर्बाद झाले. सद्यस्थितीत खरिपाच्या पिकाची हंगाम सुरू झाले आहे, परंतू आस्मानी संकटानी त्रस्त शेतकऱ्या समोर सोंगणी कामासाठी मजुर मिळत नसल्याने नवे संकट उभे ठाकले आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या अडचणी पाहता बुलडाणा विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय गायकवाड यांनी जिल्हा प्रशासनाकडे मजूरीसाठी येणाऱ्या परप्रांतीय मजूरांच्या वाहनावर कारवाई करण्यात येवू नये अशी मागणी केली आहे. सदर मागणीसाठी ३ ऑक्टोबर रोजी प्रशासनाला पत्र पाठवण्यता आले आहे.
जिल्हयात साडे सात लाख हेक्टरवर यंदा खरीपाची पेरणी करण्यात आली होती. परंतू जिल्हयात सुमारे चार वेळा अतिवृष्टी नोंदवण्यात आली. या अतिवृष्टीमुळे जिल्हयातील जवळपास सर्वच तालुक्यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक शेतात पाणी साचल्याने सोयाबीन पिवळया झाल्या, तर काही ठिकाणी सडल्या. अनेक तालुक्यातील शेतकऱ्याच्या जमीनी खरडून गेल्याने नुकसान झाले आहे. आता उर्वरित मोजक्याच शेतकऱ्यांकडे खरीप हंगामातील पीके उरली आहे. सदर पीके हे सोंगणीला आली आहे. परंतू जिल्हयात मजूर मिळत न सल्याने आता शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे. जिल्हयात मजूर नसल्याने अनेकवेळा जिल्हयातील मोताळा व बुलडाणा तालुक्यात मध्यप्रदेशातून मजूर आणले जातात. सदर परप्रांतिय मजूर एकाच वाहनातून तसेच खेड्या-पाड्यातील मजुरांना त्यांच्या सोयीनुसार एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कामासाठी येणे-जाणे करावे लागते. अशावेळी पोलीस प्रशासनाकडून त्यांच्या वाहनांना अडवून करुन त्यांना आधारकार्ड, ओळखपत्र, वाहतूकीचा परवाना आदी मागण्याकरुन त्रस्त करत पोलीस विभागामार्फत अडवणूक केली जाते, त्यांची नाहक आर्थिक पिवळणूक केली जाते, यात सदर शेतकऱ्यांची मोठी अडचण होते. त्यामुळे सदर मजूरांच्या वाहनाची अडवणूक करुन त्यांना त्रास देण्यात येवू नये, पोलीस विभागाने मजुरांच्या गाड्यांची अडवणूक करू नये अशी मागणी करण्यात आली आहे.