भुमि मुक्ती मोर्चाच्यावतीने विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

33

भुमि मुक्ती मोर्चाच्यावतीने विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

नारेबाजीनी दणाणली जिल्हाकचेरी

प्रतिनिधी | बुलडाणा,

भुमि मुक्ती मोर्चाच्यावतीने विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. सदर माेर्चा २० मार्च रोजी दुपारी ३ वाजेच्या दरम्यान काढण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलनकर्त्यांनी जोरदार नारेबाजी केल्याने जिल्हा कचेरी दणाणली.
यावेळी भुमि मुक्तीमोर्चाच्या वतीने आपल्या मागण्याचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यता आले. या निवेदनात मागणी करण्यात आली आहे की, परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी, बीड येथील संतोष देशमुख, बुलडाणा येथील स्नेहल चौधरी या प्रकरणातील दोषींना तत्काळ फाशी देण्यात यावी, बुलडाणा जिल्ह्यातील
न्यायप्रविष्ट व जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रलंबित अतिक्रमीत शेतीवर प्रस्तावित व मंजूर केलेले सौर उर्जा, प्रकल्पांना तत्काळ स्थगिती देण्यात यावी, मा. सर्वाच न्यायालयाच्या २०११ च्या निर्णयाचे स्वागत पण, १९९० पुर्वीचे एस.सी.एस.टी चे अतिक्रमण त्वरीत घोषित करा, राज्यातील लाखो महसुल व गायरान जमिन धारकांच्या आर्थिक उत्थानासाठी मा. सर्वोच्च न्यायालय निर्णय व राज्य शासन निर्णय २०११ नुसार मा. मुंबई उच्च न्यायालय नागपुर खंडपिठाव्दारे केलेल्या आदेशावर राज्य शासनाने मा. सर्वोच्च न्यायालय व मा. उच्च न्यायालय मुंबई दाद मागावी. राज्यातील दलित अत्याचार प्रतिबंध व सन २०२५-२६ वर्ष बुलडाणा जिल्हासह राज्यातील वन व महसुल अतिक्रमण धारकांना पेरणी पुर्व मशागतीस परवानगी देण्यात यावी, बुलडाणा जिल्हातील जीगाव व पेनटाकळी अतिक्रमण पट्टे धारक शेतकऱ्यांच्या बेकायधेशीर पिके व घरे उध्दवस्त केलेल्या व संभाव्य अतिक्रमीत जमिन संपादन करून अन्याय प्रकरणी तथा प्रकल्पग्रस्त बाधित कुंटुंबाचे संपुर्ण पुनवर्सन व पर्यायी जमिन अथवा एक रक्कमी २० लक्ष प्रती कुंटुंब आर्थिक मोबदला देण्यात यावा आदी मागण्या करण्यात आल्या आहे. सदर मागण्या तत्काळ मान्य करण्यात याव्यात अन्यथा राज्यातील संयुक्त संघटनासह राज्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी निवेदन देतांना बाबुराव उरबार, भाई प्रदीप अंभोरे, रमेश गाडेकर, भिमराव खरात, भगवान गवई, अंबादास वानखेडे, भाई मधुकर मिसाळ, दिपक कस्तुरे, महेंद्र गवई, शेषराव चव्हाण, भरत मुंडे, नाना तायडे, भगवान तायडे, सारंगधर वाकोडे, ज्ञानदेव मिसाळ, गजानन जाधव, अनिल कांबळे, शांताराम इंगळे, रामेश्वर चव्हाण, शोभाताई झिने, दत्ता पंजरकर आदी उपस्थित होते.