बुलढाणा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढत असून, २८ हजार नागरिकांना केवळ १२ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या १० गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. मागील आठवड्यात ७ गावांतील १६ हजार लोकसंख्या टँकरवर होती, मात्र टंचाई वाढल्याने ही संख्या वाढली आहे.
बुलढाणा तालुक्यात पिंपळगाव सराई, सैलानी, ढासाळवाडी, पिंपरखेड, चौथा, मेहकर तालुक्यात पारडी, जवळला, हिवरा साबळे, वरवंड आणि देऊळगाव राजा तालुक्यात अंढेरा या गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
७६ विहिरींचे अधिग्रहण
सात तालुक्यांमध्ये पाणीटंचाईमुळे ७१ गावांसाठी ७६ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या.
देऊळगाव राजा – ९ विहिरी
शेगाव – १ विहीर
लोणार – २ विहिरी
मेहकर – ३२ विहिरी
बुलढाणा – ११ विहिरी
सिंदखेड राजा – १४ विहिरी
चिखली – २ विहिरी
परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता
मार्चअखेर पाणीटंचाई वाढण्याची शक्यता असून, टँकरवर अवलंबून असलेल्या गावांची संख्या वाढू शकते. प्रशासनाने वेळीच उपाययोजना न केल्यास मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल.