वेश्या व्यवसाय प्रकरणी अटक असलेल्या दोन महिलाचे सखी वन स्टॉप सेंटर मधून पलायन

27

वेश्या व्यवसाय प्रकरणी अटक असलेल्या दोन महिलाचे सखी वन स्टॉप सेंटर मधून पलायन

बुलढाणा, ब्युरो

वेश्या व्यवसाय प्रकरणी अटक असलेल्या दोन महिलांनी सखी वन स्टॉप सेंटर मधून पलायन केल्याची घटना आज (दि.15) फेब्रुवारी रोजी सकाळी घडली आहे.

वेगवेगळ्या घटनेतील संकटग्रस्त पीडित महिला न्यायालयाच्या आदेशाने सखी वन स्टॉप सेंटर मध्ये काही दिवसाच्या निवाऱ्यासाठी ठेवल्या जातात, अश्याच काही महिला शहरातील सखी सेंटरमध्ये ठेवण्यात आल्या होत्या, शेगाव येथे अवैध वेश्या व्यवसायात अटक केलेल्या परराज्यातील दोन महिला सखी वन स्टॉप सेंटर मध्ये (दि.28) ऑक्टोबर रोजी दाखल झाल्या होत्या, या दोन्ही महिला आज सकाळी पळून जाण्यात यशस्वी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.यासंदर्भात शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे, याच सखी वन स्टॉप सेंटर मधून महिला पळून जाण्याची ही तिसरी घटना आहे.